STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

सुट्टी लागली होssss

सुट्टी लागली होssss

1 min
70

काव्यप्रकार अष्टाक्षरी


सुट्टी लागताच मला

आता गावाला जायचे

खूप खूप आवडते

मनी बेत रचायचे   (1)


नदीवर पोहण्यात

येते लई भारी मजा 

ढकलून दे पाण्यात

मग मिळे कशी सजा!!  (२)


गोल भाकरीचा चंद्र 

साथ झुणक्याची त्याला 

तक्कू लोणचे रायते

असे तोंडी लावायला   (३)


रात्री माळवदावर

गाण्यांसंगे गप्पा-गोष्टी 

निळ्या आकाशात चंद्र 

सवे चांदण्यांची दाटी   (४)


सुट्टी संपताच माझे 

डोळे भरुन यायचे 

लवकर ये रे राजा 

मामा-मामी म्हणायचे  (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन