STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Others

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Others

सुटका

सुटका

1 min
12.1K

सुटल्या बेड्या तुटले बंधन.

मी आनंदी जगेन जीवन

जग हे अवघे र बंदिशाला

येथे येतो पथ चुकलेला.

अविचारी तो बंदी येथला.

इथे जखडला गेला अडकून. (१).


घडला हातून गुन्हा अवचित.

क्षण क्षण अवघड शिक्षा भोगत.

झाली सुटका आज अखेरी.

करतो माझे मी अभिनंदन.  (२).


विसरून आता दुष्ट दिवस ते.

हालअपेष्टा जन निंदेचे.

आज पाहिले जग पूर्वीचे.

झाली सुटका त्या नरकातून (३).


नाही अघोरी कधी वागणे.

पुन्हा अशा चुका न करणे.

माणूस म्हणुनी जगी वावरीन.

चुकल्याविन का सुधारते मन (४).  


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન