|| सुसाट ... परीणाम ||
|| सुसाट ... परीणाम ||
विविध क्षेत्रात होत आहे प्रगती
जीवघेणी वाढत आहे वाहनांची गती
नकळत वाढत आहे वेग
सांगुन नाही येत हि वाईट वेळ
नाही घालत हेल्मेट, नाही पाळत सिग्नल नवतरुण
आडवेतिडवे कसेही येतात समोरासमोरुन
अतिवेग हा नेतो कुठल्या थराला
उध्वस्त करतो जीवन, संपुर्ण घराला
शिक्षा भोगतात, दंड भरतात, सर्व जीवन खराब
मित्र मैत्रिणी पैज लावतात, चालवुन दाखव गाडी पिऊन शराब
थट्टा मस्करीत वाढतो वेग
क्षणात घात करतो एक पेग
स्वप्नपुर्ती होण्याआधी तुटते आयुष्याची दोरी
दारु पिऊन गाडी चालवणे कृत्य अघोरी
क्षणात उतरते धुंदी, नाही लागत गाडीला ब्रेक
जातो घाबरुन
पश्चात्ताप क्षणात येतो
पण नियती घालते अंगावर पांढरे पांघरुण
तरुणतरुणींना कळकळून सांगणे
वेगावर ठेवा नियंत्रण
वेळेच्या आधी नका देउ
मरणाला आमंत्रण ||
