सुरक्षा
सुरक्षा
1 min
304
सुरक्षा
सुरक्षा देता का सुरक्षा?
या सबला म्हणणाऱ्या
बलिकेला कोणी
सुरक्षा देता का सुरक्षा ?
गल्ली रस्तोरस्ती
लुटतायत तिची अब्रू
तिच्या अब्रूची लक्तरे होतायत
सुरक्षा देता का सुरक्षा?
नाहीय ओ सुरक्षित
माझी प्राणप्रिय छकुली
तिला छेडतायत सारीकडे
सुरक्षा देता का सुरक्षा?
लहान नाही मोठी नाही
साऱ्यांच्याच लेकिसुनांची
अब्रू लुटतायत सरेआम
सुरक्षा देता का सुरक्षा?
