STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

4  

Pratibha Bilgi

Others

सुरेख माझे बालपण

सुरेख माझे बालपण

1 min
487

सुरेख आठवणींचा संगम , आहे माझे बालपण

शाळेत केलेला दंगा अन् सुट्टीतले धमाल ते क्षण


फसवेगिरीला जिथे कदापी नाही वाव

अशा ठिकाणी माझ्या मामाचे टुमदार गाव


वडाच्या पाऱ्यांचा , झोका उंच जात असे

जवळच विटी - दांडूचा , खेळ छान रंगत असे


गुराळात जाऊन चाखली होती गुळाची चव

जोडीला कैऱ्या , बोरे , चिंचांचा आंबट - गोड संगम


लपंडाव खेळायला अख्खा दिवस पूरत नसे

शोधूनही कित्येकदा एखादा मित्र सापडत नसे


शुभंकरोती संगे संध्याकाळी लागायचे दिवे

गृहपाठही सगळ्यांसोबत बसून पूर्ण होत असे

.

पावसाळ्यात सोडलेली कागदाची नाव अजूनही आठवते

बालपणीच्या जगात पुन्हा एकदा रममाण व्हावेसे वाटते.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍