सुंदर सकाळ
सुंदर सकाळ
गवत हिरवे, हिरवी झाडे
हिरवाईने नटलेले डोंगर!
झाडा वरती बसून पक्षी
रंगू लागले स्वप्नसुंदर !!
सुंदर फुलांनी फुलल्या वेली
फुलपाखरे गोळा झाली !
फुलांवरती बसुनी त्यांना
रंग वेगळा देऊन गेली !!
गवताची ती हिरवी पाती
दवबिंदूंनी सजून गेली!
रवि किरणांनी येऊन त्यांना
मोत्याचे रूप देऊन गेली !!
वेगवेगळे सुंदर पक्षी
प्रभात वेळी गाऊ लागली !
सुंदर त्यांच्या गाण्याला ही
सप्तसुरांची लहर आली !!
हिंडता फिरता प्रभात वेळी
निसर्ग मनी भरून घ्यावा !
निसर्गातील अनुभवांचा
मनी ठेवा भरून राहावा !!
