सुन मी या घरची
सुन मी या घरची
1 min
363
पहाटेच्या
या पहरी
दळिते मी
जात्यावरी.
ओव्या गाते
जनाईच्या
बंधूसाठी
मुक्ताईच्या.
तालेवार
भरतार
हाय मोठा
सरदार.
सासू मही
मायवानी
जीव लावी
लेकीवानी.
सासराबी
जणू बाप
झरे माया
आपोआप.
नांदते मी
सासुरात
सुखे पूरी
पदरात.
वंजळीत
सारं काही
कशाचंच
उणं नाही.
