सुखदुःख
सुखदुःख
1 min
11.9K
दुःख लपवतात सारे
सांगता येत नाही शब्दात
कोंडी होते त्यांची
झुरतात मग मनात
सुख मात्र येते
फिरून गावभर
कौतुक होते तयाचे
अगदी तोंडभर
सुखानंतर
दुःख येते
दुःखानंतर सुख
येऊ पहाते
येतात कधी एकत्र
साथ संगत देत
सारेच वाटे विचित्र
करतात जेव्हा मात
सुखदुःखाचा हा फेरा
येतो सर्वांच्या वाट्याला
त्याशिवाय मजाच
नाही येत जीवनाला