सुखद क्षण
सुखद क्षण
1 min
527
सुखद क्षणात
दु:ख विसरले
क्षणभर मनी
सुख बरसले...
सुखाची किनार
फिरुनी गं आले
अलवार सरी
झेलत मी गेले...
विविध रंगाचे
रंग उधळले
रंगोत्सव सारे
श्रावणात न्हाले...
उघडुनी आले
अंतरी कवाडे
त्यातच पडले
श्रावणाचे सडे...
कुरळया कुंतली
शोभतो मोगरा
सुगंधित झाला
मंद धुंद वारा...
जीवन सजते
सुखाच्या सरींनी
दु:खाचे कलह
बाजूला ठेवूनी...
