STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

सुखाच्या क्षणाला

सुखाच्या क्षणाला

1 min
613



सुखाच्या क्षणाला कधी भाळलेले

रमाया नसे मज झरे लाभलेले...


नदी वाहण्याने तटे साफ झाले

इथे सागराने तिला व्यापलेले....


इथे सूर्य येतो तळपतो उन्हाळा

सर्वच वाहणारे झरे थांबलेले....


कसे काय पाहू जगातील वारे

असे दाट कोडे किती साठलेले


कशी भंगलेली मनाची हराळी

असे काय झाले मळभ दाटलेले...


अशी धडकते ही मनाची कवाडे

मला पेलवेना गडी भेटलेले.....


किती वार झाली कसे सावरावे

कसे हाल माझे इथे कावलेले..


हसावे कसे मी कसे मी रडावे

सजाया घराला नसे भेटलेले...


नशीबात होता हर्षाचा वर्षावा

सजा भोगतो आत सांभाळलेले....


नभी चांदण्यांनी घरे बंधली ही

धरेवर चिता रोजही पेटलेले....


साहित्याला गुण द्या
लॉग इन