सुखाची झोप
सुखाची झोप
1 min
397
श्रमाचा पैसा नीतीचा
नाही कुणाच्या भीतीचा
शेतात राबतो शेतकरी
तेव्हा खातो आपण भाकरी
कष्ट करतो कामगार
थेंबे थेंबे तळे साचणार
श्रमजीवी सुखाने झोपती
लबाडाची झोप कोपती
श्रमजीवी करतो चाकरी
आनंदाने पचवतो भाकरी
सुखाचे फळ येती कष्टाला
चाळे सुचती भ्रष्टाचाराला
ईमानदारीचा पैसा श्रमाचा
आहे खरा आपल्या घामाचा
श्रमाने मोठे आम्ही होणार
श्रमाने आरोग्य जपणार
