STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

सुखाचा शोध

सुखाचा शोध

1 min
190

सुखाचा शोध घेण्यासाठी जो, तो

लागलाय वेगवेगळ्या कामापाठी

संसार सुखाचा होण्यासाठी

जीवन आरामात जगण्यासाठी//१//


सगळेच करतात काहीतरी काम, धंधा

सारे जगावे म्हणून राबतो पोशिंदा

आज ना उद्या मिळेल सुख या आशेवर

ठेऊन भरवसा आपल्या मनगटावर//२//


कुणाची रोजचीच होते भटकंती

संसार सागरी मिळवण्या शांती

कुणी करतो रात्रीचा दिवस

कुणी सुखासाठी बोलतो नवस//३//


दूर माळरानावर त्या खडकाळ शेत

नशीब आजमावू पाहतो कुणी त्यात

भर दुपारी कष्ट धारा कपाळी

राबतो कुणी कसतो जमीन काळी//४//


सुखाचा शोध घेण्यासाठी

करती पाखरे भटकंती

सुख काही मिळत नाही

मात्र होते जीवनाची क्षती//५//


Rate this content
Log in