सुगी
सुगी
1 min
569
धो धो पडला पाऊस
भिजली काळी रानं
बियांना फुटलं कोंब
कोंबाला फुटली पानं
कडाक्याच्या थंडीत
कधी धुके पडते दाट
पेरु बोरं खाण्यासाठी
खुणवते रानाची वाट
ज्वारी गहू हरभऱ्याची
जेंव्हा सुगी होईल सुरु
रानमेवा चाखण्यासाठी
रानात हुरडापार्टी करु
घरदार राबलं रानात
धनधान्य खूप पिकलं
बुजगावणं साथीला
त्यानही पिकं राखलं
सुगीमध्ये रानोरानी
कापणी मळणी सुरू
स्वच्छ करुन धनधान्य
पोत्या पोत्यामध्ये भरु
सुगीमध्ये धनधान्याच्या
तयार व्हाव्या खूप राशी
अवंदाच्या या सुगीमध्ये
कुणी ना राहो उपाशी!!!
