STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

सत्यमेव जयते...!

सत्यमेव जयते...!

1 min
504

आज सत्यमेव जयते

म्हणजे काय हे जगाला कळेल

जनतेच्या दरबारात

सत्त्याला मान मिळेल


घोर कलियुग 

म्हणजे काय हे उमजेल

जनतेलाही आता

योग्य काय हे समजेल


दूध का दूध पानी का पानी

हे आज पहायला मिळेल

आळवावरच पाणी

सांडलेलं दिसेल


मरू भूमीतलं मृगजळ

नजरे समोर नाचेल

मय सभेतील मायाजालाने

डोळ्यांचे पारणे फिटेल


सत्य संकल्पना साक्षेपी असते

हे ही आता पटेल

आकड्यांच्या खेळात

सत्याचा खरा कस लागेल


सोने बावन्न कशी

सर्व परिक्षणातून बाहेर पडेल

सत्येच्या खुर्चीत

योग्य तीच व्यक्ती बसेल


जनतेची इच्छा जनतेची इच्छा

काय ते परमेश्वरच जाणेल

मी मी म्हणणाऱ्यांना आता

तोच धडा शिकवेल


कल्पना बाळबोध असली तरी

तीच इतिहास घडवेल

आणि

सत्येच्या खुर्चीत योग्यच व्यक्ती बसवेल


काळ मोठा जादूगार

हे ही आता कळेल

योग्य तो न्याय

आता जनतेला मिळेल



Rate this content
Log in