STORYMIRROR

Dipali patil

Others

4  

Dipali patil

Others

सत्य

सत्य

1 min
367

बालपणीचा बागुलबुवा

भीतीचे मनात घर

फुटताच भ्रमाचा भोपळा

नजरेसमोर येत खरं


तारुण्याची लागताच ओढ

विचलित होत सार सार

भान येताच जीवनी

सुरु होते मर मर


गृहस्थाश्रमात मिळते जोड

फुलून येतो संसार

कर्तव्ये अमाप निभावताना

टोचते पावसाची सर


वाजताच वृद्धापकाळाची काठी

निवांत होतो जीवन दरबार

घडते नियती लिखित नक्की

हेच अंतिम खरं, हेच अंतिम खरं


Rate this content
Log in