सत्य स्वप्न
सत्य स्वप्न
1 min
376
स्वप्न आणि सत्य
श्रेष्ठ ह्यात कोण ?
प्रश्न पडतो मनी
महान हेची दोन
स्वप्नात नव्हते कधी
लेखनी येईल हाती
जाहले पूर्ण शाश्वत
सत्यात उतरले अंती
वाटे मज वारंवार खंत
कसे पोहचतील माझे विचार
जगी सर्वापर्यंत सहज
परी मिळाले महान शस्त्र खर
आभारी मी त्यांची
ज्यांनी केले मार्गदर्शन
राहो मज प्रवास निरंतर
हेच चिन्तते माझे मन
