STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

स्टेटस सिंबोल

स्टेटस सिंबोल

1 min
347


गर्दीत हरवलेला एक मी 'इंडियन'

क्रिकेट माझे जीव कि प्राण

मॅच कुठली का असेना

चवीने गप्पा हाणतो त्याच्यावर तासोनतास...


करून पैशाचा जुगाड

काढतो एक तिकीट 

मैदानावरची क्रिकेट

मॅच बघण्यास...


माझ्यासारखे अनेक असतात त्या गर्दीत

कोणीतरी येत 'टि शर्ट' वाटुन जातं

मग कोणीतरी येत झेंडे हाती देवुन जातं

आजुबाजूच्या त्या गर्दीत मी एकरूप होतो...


कोणी तिकडे नुसते 'सिक्सर' 

म्हणून ओरडले तर आनंदाने 

उड्या मारत

ओरडत झेंडे फडकवतो...


मैदानावर कोण काय खेळत

हे साध्या डोळ्याने 

दिसत सुद्धा नाही

अवलंबुन राहतो गर्दीच्या हालचालीवर...


'स्टेटस सिंबोल' घेऊन

गर्दीतला एक 'इंडियन' बनतो

माझे मी हरवलेला 

मॅचच्या कॅमेऱ्यात पाठमोरा कैद होतो...


Rate this content
Log in