सत्तावीस एप्रिल (27)
सत्तावीस एप्रिल (27)
1 min
11.5K
ते काय सांगतात, हे काय सांगतात
रा म नाही त्यात काय पण बोलतात
व्या धी कुणाला चुकली काय.?
दि वे अकलेचे लावणे, कोण सोडील काय..?
व टवट फुकाची ऐकून
सा रं जीवन सैरभैर झालं
ची लट सुद्धा गुरगुरु लागलं
सू र नाकर्ते पणाचा गाऊ लागलं....!
प्र यत्ने वाळूचे कण रगडिता
भा ग्य उदयास आलं
त टस्थ भूमिकेने सुद्धा चांगलंच काम फत्ते केलं....!
हवं ते करा म्हटल्यावर
इच्छित मनोरथ पूर्ण झालं
घरच्या घरीच आंनदाने
इच्छा भोजनही पार पडलं....!
क्या खा तो दम खा
चांगलंच पथ्यावर पडलं
सोशल डिस्टन्समुळे
बाबांनो खूप काही साध्य झालं....!
