सत्ता
सत्ता
1 min
368
ईथ जगायला लागतो भत्ता, चौका चौकात चालल्यात गप्पा.
जमतोय सगळ्याचा टप्पा, आता येनार आमचीच सत्ता.
मतदारांचा हाय ईथ गुंता, प्रगतीचा नाही ईथ पत्ता.
शेतकऱ्यांला जीवाची चिंता, तिथ नेत्यांची बघा मालमत्ता.
ओरबाडून खाणाऱ्यांच्या कट्टा, प्रलोभनाच्या मरतात गप्पा.
राजकारणी लोकांचा मत्था, टाळूच्या लोण्याचा गत्था.
डोळ्यांनी बघन्या आलाय टप्पा, जनतेच्या मनाचा कप्पा.
योग्य उमेदवार जो सच्या, आता येनार जनतेचीच सत्ता.
