स्त्रीशक्ती
स्त्रीशक्ती
थोर जिजाऊ आदर्श माता
केले संस्कार बालशिवबांवर
घेऊन वसा स्वराज्यस्थापनेचा
घडविले पुत्रालाच रणधुरंधर
जपून तिने पोरक्या संभाजीला
ओळखला स्वकीयांचाच कावा
पित्यापाठी दिले शस्त्रप्रशिक्षण
घडविला महाराष्ट्रासाठी छावा
दुधवाली रायगडीची हिरकणी
ममतेपोटी बनली रणरागिणी
किर्रर्र रात्रीचा टकमक कडा
उतरली धैर्याने ती बावनखणी
हसूनी खेळूनी नारी कुटुंबात
दुःखे गिळतेच आतल्या आत
दुसऱ्यांसाठी झिजे चंदनापरी
महत्वाकांक्षाही तिच्या उरात
क्षणाची पत्नी आयुष्यभर माता
आजी बहीण नात्यानेच वहिनी
नानारूपात फिरतेच समाजात
हर स्त्रीची निराळी एक कहाणी
सलाम करू तिच्या स्त्रीशक्तीला
उचलून वाटा समाजप्रबोधनाचा
मुलगा मुलगी नसावा भेदभाव
डंकाच पिटू कन्येच्या कर्तृत्वाचा
