स्त्रीशक्ती
स्त्रीशक्ती
आई,बहीण, मुलगी, बायको,
या अगोदर आहे ती माणूस
नको तिची विटंबना करू,
नको तिला छळूस..
घेतलास जन्म तिच्या पोटी,
भान याचे राहू दे तुला,
काळ आता बदलतो आहे,,,
नाही राहिली ती अबला...
पुरुषांच्या खांद्याला खांदा,,
लावून तीही पुढे जात आहे
नाही ती कमकुवत,
तिलाही तिचे अस्तित्व आहे...
होत्या एके काळी,
झाशीची राणी आणि माता जिजाई,,,
होती अहिल्या,होती सीतामाई...
कितीतरी नावे अशी,,
ज्यांची थोरवी गायली जाते,
ती एक स्त्रीच असते जी,,,
राजा हरिश्चंद्र नि शिवबा जन्माला घालते..
नजरेसमोर आणा शिवछत्रपतींचा बाणा...
जो सांगून गेला....
परस्त्री माता,भगिनी समान माना
