"स्त्रीशक्ती महान"
"स्त्रीशक्ती महान"
मिळून साऱ्याजनी राबवूया
थीम "Together We Can"ची
एक आणि एक दोन,एक आणि एक आकरासुद्धा
एकीचे बळ सर्वांहूनी मोठे
नाही होऊ शकत, एकट्याने काम मोठे
गुंफूनी सख्यानो हात एकमेकांत
म्हणूया "Together We Can"
स्त्रीशक्तीला म्हणतात 'महान'
करेल ती कायापालट जगताचा आणले जर मनात
ध्यास हवा,साथ हवी सखींची
हाहा म्हणता पार करूया अंतरे मैलांची
कुणी,सवित्री कुणी लक्ष्मी कुणी जीजा
नाही कुणी ही देवापुढे खुजा
दिली त्याने ताकद वापरूया
गावाला, शहराला,देशाला पुढे नेऊया
कार्याची पावती मिळेल नक्की
होईल इच्छापूर्ती, म्हणूनच मिळून साऱ्याजणी
आणूया प्रत्यक्षात थीम "Together We Can"ची।।
