STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

स्त्रीलावण्य

स्त्रीलावण्य

1 min
270

विचाराना ही भाग पाडले, शेवटी सुंदर व्हायला.

बनवणाऱ्यानेही वेळ घेतला असेल, हे रूप द्यायला.


दिल तर खर पण, मिरवता तुम्ही दिमाखात.

पवित्र बावन काशी सोन, उगाच का म्हणतात.


म्हणतात आणी लिहितात, खूप काही अगदी कौतुकाने.

वर्णन कितीही करा, चमक अपूर्ण आहे काजव्याप्रमाने.


विलक्षण चमक ती खरी, आहेच ती तुमच्यात.

प्रत्येक स्त्री चे सौंदर्य वेगळ, खोटी नजर आमच्यात.


थोड विचार केला तर, बदलतील विचार हीच खात्री.

आहेत सगळ्यात सुंदर, आई बहीण बायको तीच ती स्त्री.


Rate this content
Log in