STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

स्त्री...!

स्त्री...!

1 min
371

स्त्री ला समजणारी

यंत्रणा अजून तरी

विकसित झाली नाही


कारण त्यासाठी

स्त्री अजून तरी

पुरुषा मागे उभी राहिली नाही


प्रत्येक यशस्वी

कार्या मागे स्त्री असते

हे कोणी तरी म्हंटले आहे


त्यानेच या यंत्रणेचे

सारे मार्ग बंद करण्याचे

कार्य केले आहे


अंध श्रद्धेचे

हे एक जणू

न सुटलेले कोडे आहे


त्या कोड्या मागे

मात्र नक्कीच

स्त्री खंबीर पणे उभी आहे


सर्वच भूमिका

यशस्वी पणे 

पार पाडून ती अलिप्त आहे


पुरुषांच्या माथी

साऱ्या अपयशाचे 

खापर फोडण्यात ती तरबेज आहे


जे जे चांगले

ते ते सारे 

तिचेच आहे हे सत्य आहे


कारण खरेच

योग्य साथीदाराची निवड

हेच तिचे सर्वोत्तम कटू सत्य आहे


म्हणून प्रत्येक

यशस्वी कार्या मागे

स्त्री असते हे खरेच सत्य आहे


यशा मागे स्त्रीच असते

या अंध श्रद्धेचा

हाच खरा पहिला विजय आहे


प्रत्येक रूपाची

ती खरी राणी आहे

तीच खरी शक्ती आहे


तिच्या शक्तीला

समजणे उमजणे

हेच यशस्वी जीवनाचे गमक आहे


स्त्री लागी

सर्व काही साध्य आहे

हेच त्रिवार सत्य आहे....!



Rate this content
Log in