STORYMIRROR

Devendra Ambekar

Others

3  

Devendra Ambekar

Others

"स्त्री"

"स्त्री"

1 min
1.1K


काय असते "स्त्री" शक्ती

हे एका "स्त्री" पेक्षा कोणी

चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही,

स्वतःच्या आयुष्यात किती ही

संकटे असली तरी चेहऱ्यावर

मात्र गोड हास्य ठेवते

ती म्हणजे "स्त्री"


स्वतःच आयुष्य झिजवून

दुसऱ्याला खंबीरपणे उभ

राहायला प्रोत्साहन देते

ती म्हणजे "स्त्री"


आपण जन्माला येताच

एका गोड व्यक्तीचा चेहरा

आपल्या डोळ्यासमोर येतो

ती म्हणजे "स्त्री"


लहान मुलाच्या मुखातून

बोबड्या बोलाने निघणारा

पहिला शब्द 'आई'

ती म्हणजे "स्त्री"


खरचं "स्त्री" हा शब्द

जरी छोटा असला तरी

त्यामागील अर्थ मात्र मोठा आहे,

प्रेमाचा खरा अर्थ

जाणून घेण्याचा मार्ग

आणि जिच्यात सगळं

विश्व सामावलेलं आहे

ती म्हणजे "स्त्री"


जिच्या उदरात होतो जन्म

व मृत्यू ही तिच्या चरणाशी यावा

ती म्हणजे "स्त्री"


Rate this content
Log in