स्त्री तू खरंच स्वतंत्र आहेस?
स्त्री तू खरंच स्वतंत्र आहेस?
1 min
312
रामाच्या काळात सीता पेटली
माता भार्या कन्या जाहली
तरीही संशयित ठरली
अग्नित स्वाहा झाली
ती सम्राज्ञी राज्याची राणी
स्त्री तू खरंच स्वतंत्र आहेस?
कलीयुगात तुझे अस्तित्व काय
वेदनेचे मुक आकांत
अस्तित्वाचा अंतिम आक्रोश
वासनेचा बळी जळलेला देह
असह्य वेदना
हेच का तुझे स्वातंत्र्य
स्त्री तू खरंच स्वतंत्र आहेस?
बेटी बचाओ बेटी पढाओ नारा
सुरक्षित कराया मागे पडला
अब्रुवर घातला जातोय घाला
शिक्षेचा ना डर कुणाला
अनाचार सर्वत्र माजला...!
