स्त्री तुझी कहाणी
स्त्री तुझी कहाणी
1 min
153
चूक तर नाही केली देवांनी
स्त्री तुला जन्म देऊनी
अशा कशा ग तुझ्या व्यथा
गर्भापासून वृद्धापर्यंत वाटेवरती काचा
कधी नकोशी म्हणून मारली
तर कधी हवी म्हणून नासवली
कधी हुंड्याच्या अग्नीत होरपळी
तर कधी वृद्धाश्रमात नेऊन टाकली
चारित्र्यवान अग्निपरीक्षा तिनेच दयावी
भावकीतल्या भांडणाची शिक्षा तिलाच दयावी
युगानुयुगे चालू पुरुष प्रधान वाणी
स्त्री जन्म तुझी हीच कहाणी
लक्ष्मी सरस्वती दुर्गा म्हणून पुजावे
की अत्याचाराच्या साखळदंडातून सोडवावे
विचार करून समाजानेच सुधरून जावे
