स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
1 min
287
स्त्री शक्ती समजू नका मला अबला नवदुर्गा अंगात माझ्या जर कोणी घात केला असेल तलवार हातात माझ्या मुलगी बहीण मैत्रिण पत्नी सून वहिनी आई मावशी काकू आत्या निभावते सर्व नाती माया लावुनी समाजात वावरताना आदराचा मान असावा प्रत्येकाच्या नजरेत स्त्री शक्तीचा अभिमान असावा जसे कोमल मन माझे तेवढेच कठोर क्षण माझे स्वप्ने सारी मनात ठेवून कर्तव्यापोटी जगणे माझे माझ्या असण्याने घराला घरपण घालू नका माझ्यावर दडपण तुमचीच एक कहाणी आहे विसाव्या शतकातली नारी मी पण
