STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
330

स्त्री जन्मा तुझी कहाणी, 

तू जननी, बीज धारिणी,

तू पत्नी, माता, भगिनी,

अन्नपूर्णा, तरी रणरागिणी!


तू जिजाऊ, तू लक्ष्मीबाई,

हिरकणी, इमानी पन्ना दाई,

अनेक तुझ्या गाथा, व्यथा, 

ऋणाची कशी करू उतराई!


कर पादाक्रांत शिखरे, 

तुला नाही कुणाची भीती, 

तुझाच सारा आसमंत अन,

तुझीच सारी ही धरती!


गुलाब तू नाजुक म्हणूनी,

खुडले कुणी विभत्स जरी,

काट्याचे वरदान फुलाला,

रोषीत होऊन डंख करी!


स्त्री शक्तीचा महिमा न्यारा,

तुझ्या उरात वात्सल्यछाया,

कठीण नाही चढण कुठली, 

तुझ्या कुशीत आभाळमाया!



साहित्याला गुण द्या
लॉग इन