STORYMIRROR

Kshitija Bapat

Others

3  

Kshitija Bapat

Others

स्त्री मनाचा गुंता

स्त्री मनाचा गुंता

1 min
157

माया ममता वात्सल्याच्या

हळव्या मनात कशी चिंता

भावनेच्या याभरात कसा

सुटेल स्त्री मनाचा गुंता


दुविधा मनी चलबिचलता

कशा व्यक्त होतील भावना

आतल्या आताच होती तिची

नेहमीच होते कुचंबना


कर्तव्यआणि प्रेमात आड

येतात हे बंधने प्रेमाचे

तरी वाटतात हवे हवे

नाजुक बंध गुंतागुंतीचे


रेशमाचे बंधन जपते

जिव्हाळ्याने प्रेमाने हळुवार

होतो गुंता जेव्हा भावनांचा

नाते ते जपते जिवापाड


मनामध्ये सतत विचार

का लादले नियम बंधने

स्त्री मन असे दयाळू

का बर सर्व सहन करावे



Rate this content
Log in