स्त्री माणूस
स्त्री माणूस
1 min
122
फार काळ झाला गेला
असे म्हणता म्हणता
युगानुयुगे कधी सरली
समजलेच नाही
तिच्या अस्तित्वाची कहाणी
अजून कशी जमलीच नाही
एका युगातून दुसऱ्या युगात जातानाही
स्त्री ही स्त्रीच राहिली
माणूस झालीच नाही
कोण्या एका काळी खेचलेल्या पदराला
या युगातही न्याय मिळाली नाही
ती अबला होती म्हणताना
तिचे कर्तृत्व जगाला कसे कोण जाणे
या युगातही समजलेच नाही!
