स्त्री जन्म
स्त्री जन्म
1 min
438
स्त्री, माया, ममतेची माऊली,
अतोनात प्रेमाची सावली,
सगळ्यांसाठी झिजणारी,
स्वतःला विसरून रात्रंदिन राबणारी
तिचाही विचार कधी केलाय,
तिलाही हवं नको ते विचारलंय,
कधीतरी तिच्या मनात पाहा डोकावून,
कितीतरी गोष्टी असते मनात साठवून
जरा स्वतःला बघा तिच्या जागी ठेवून,
समजून घ्या तिला घ्या भावना जाणून,
स्त्री म्हणून जगणं एवढं नाही सोपं,
त्यासाठी स्त्री म्हणूनच जन्माला यावं लागतं
