स्त्री हट्ट
स्त्री हट्ट
जगातील ख्यातीप्राप्त तीन हट्ट,
बाल, स्त्री आणि राजहट्ट.
राजहट्ट असतो सार्वजनिक हट्ट,
कधी जनहितकारी तर कधी विनाशकारी.
बालहट्ट असतो पारिवारीक हट्ट,
परिवाराची असते सामूहिक जबाबदारीची खटपट.
बायकोच्या नवीन-नवीन इच्छपूर्तीची रट,
सर्वांत लय भारी असतो हा पत्नी स्त्रीहट्ट.
बाल हट्ट व राजहट्टाचा कधीकाळी असतो अंत,
परंतु पत्नी स्त्री हट्ट हा चालतो अनंत.
लांबलचक इच्छपूर्तीचा एक असतो असीम संच,
पूर्ती करणारा नवरा फक्त असतो अधिकृत मंच.
स्त्री हट्टाची पकड असते खूपच घट्ट,
रथी-महारथी स्त्री हट्टाने होतात पस्त व चट्ट.
स्त्री हट्टासमोर गौण आहे पतीचे अमरत्व,
पतीला सोडावे लागते त्याचे तत्व आणि महत्व.
