स्त्री एक शक्ती
स्त्री एक शक्ती
1 min
130
लवकर उठते
स्वयंपाक करते
घरचे आवरून
शाळेला जाते.....
परिपाठ घेते
मुलांना शिकवते
त्यांच्यावर उत्तम
संस्कार करते....
अभ्यास करतात
माझी मुले छान
उपक्रम करतात
असून जरी सान.....
अबला नव्हे सबला
मी आहे एक नारी
अध्ययन करते मी छान
ही चर्चा मुलांच्या घरी....
मी मुलांत रमते
छान आनंदी राहते
मग माझ्या मुलांना
मी खूपच आवडते.....
