स्त्री एक शक्ती
स्त्री एक शक्ती
1 min
122
स्त्री एक शक्ती आहे
सर्वांना चेतना देणारी
स्त्री एक माता आहे
माया ममता देणारी,
स्त्री एक बंध आहे
कुटूंबाला बांधणारा
स्त्री एक गंध आहे
घरोघरी दरवळणारा.
स्त्री एक पणती आहे
दुसरयांसाठी जळणारी
स्त्री एक प्रेरणा आहे
त्यागवृत्ती शिकविणारी.
