स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा
1 min
130
अजातशत्रू , तू बलशाली
अंबरा एवढी ढाल
त्रैलोक्या मधी तुझाच डंका
पवित्र तू गं सकाळ
तू जिजाऊ , तू सावित्री
रुप तुझे गं नार
शिक्षणाचा अग्नी पेटविला
शिवास दिधला आकार
तू अहिल्या दुःखी जणांची
तू गं राजकारिणी
वात्सल्याचा अथांग सागर
तू गं माय हरिणी
आम्रतरू सम तुझी गं छाया
लाजतो कल्पतरू
पती व्रता गं तू रामाची
तुचि पहिला गुरु
अन्नपूर्णा अन् तू गं रुचिरा
तृप्त करती मना
किती वर्णावे गुण तुझे गं
सकलांचि तू प्रेरणा
