स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा
उदात्त व्यक्तीमत्व पण नाजुक काया
प्रेमळ स्वभाव आणि सद्गुणचि छाया
पेलते भार धरित्री सारखा
अनुपम सौंदर्य करते सर्वांवर माया
धीर देते कुटुंबाला,
तिच्यासारखा सल्लागार नाही दुसरा
उणीव भासे ना मित्रांची
पाठिराखा जिवलग नाही मितरा
प्रेरणा जिजाऊची घेउन
अजरामर शिवराय झाले
घडले डॉक्टर आंबेडकर रमाई मुळे
गर्जून ज्योतिबा फुले
तिच्या हिंमतीने बुरुज
झाला हिरकणी
रानी लक्ष्मीच्या वतीने
खुप लढली झलकारी
यशोधरेच्या संयमाने
सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले
मस्तानीच्या प्रेम बंधाने
बाजीराव पेशवे किर्तीस आले
गांधीच्या मागे कस्तुर्बा
प्रेरणा झाली
राहिली कितितरी अनामिक
इतिहासात दडुन गेली
अमृता प्रीतम, महाश्वेतादेवी
साहित्यात नाव सोनेरी कोरून गेले
अहिराणी भाषेत बहिनाबाई
वास्तव्याचा संसार मांडून गेली
तिच्या प्रेरणेने, दगड ही पारस होतो
त्यागाने तिच्या अघटित घडुन जाते
वैशालीचे सौंदर्य आणि सुजाताची खीर
अमुलाग्र बदल घडवुन जाते
मुर्ती एक नाते अनेक
प्रत्येक नात्याला साज देते
स्त्रिविना अंधकारमय हे जग
स्त्री शक्तीची ग्वाही देते
