स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा
1 min
287
परमेश्वराची सुंदर प्रतिकृती
ती आहे स्त्री ची आवृत्ती
तिच्यावर लादल्या गेल्या अनेक रितीभाती
पण सांभाळते ती सर्व नातीगोती
होतो त्रास तिला मोठा किती
तक्राराीचा सुर न छेडता केवळ राबती
स्त्री जन्म घेण्या किती भाग्य लागती
अबला ,ललना तुज कोण म्हणती
कधी दुर्गा ,चंडी,पुरंध्री तू असती
अशी अनेक रूपे तुझी दिसती
आहे ती प्रेरणेची भरती
कधी न येई तिला ओहोटी
फक्त्त महिलादिनानिमित्त
हारतुरे शब्दसुमनांची मिळती
मनी नाही आस तिच्या
नित्यनेमाने ओवाळावी आरती
खरचं ती मूर्ती त्यागाचीच असती
