स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा
1 min
401
स्त्री एक प्रेरणा
विविध रुपात दिसते
हृदयाच्या कप्प्यात
घर करून बसते
आयुष्यात सर्वप्रथम
आई बनून येते
बोटाला धरून
चालायला शिकवते
योग्य संस्कार करुन
जगण्यालायक बनवते
माया करते मुलांवर
प्रेरणादायी राहते
लग्न झाल्यावर स्त्री
पत्नीचे स्थान घेते
नवऱ्यावर प्रेम असते
घर संसार चालवते
संसार सुखासाठी
अपार कष्ट करते
नवऱ्याचे, मुलांचे
प्रेरणास्थान बनते
सुंदर, तेजस्वी, कणखर
संयमी परंतु सोज्वळ
शूर, पराक्रमी, निग्रही
अभिमानी तरीही प्रेमळ
अशा अनेक रुपांत
वावरत असते स्त्री
कर्तृत्ववान गुणांमुळे
प्रेरणादायी होते स्त्री
