स्त्री चे सामर्थ्य
स्त्री चे सामर्थ्य
1 min
298
स्त्री चे सामर्थ्य जसे
असते लढण्यात
स्त्री चे सामर्थ्य असते
दुसऱ्यांना समजून घेण्यात
कधी कधी जेव्हा,
हतबल भासते शक्ती
तिथे तिथे कामी येते,
कल्पक स्त्री ची युक्ती
नेहमी गर्व बाळगून चालत नाही
असावी लागते सहनशीलता
नेहमी डोळ्यात भरून चालत नाही
दाखवावी लागते शालीनता
अंगी असतात नाना कला
अनेक भूमिका पार पाडते
कोणी साथ देवो न देवो
स्त्री स्वतः च समर्थ असते
