स्त्री भ्रूण हत्या थांबवा...
स्त्री भ्रूण हत्या थांबवा...
आज स्त्रियांसोबत किती तरी होत आहे अत्याचार
आज माणसं का झाली एवढी दुराचार ...?
का झालीत मुलाच्या जन्मासाठी लाचार
कशाला करतात हे.. स्त्री भ्रूण हत्येचा विचार..?
संपूर्ण फुलण्याआधीच तोडतात सुंदर गोंडस कळी
मुली वाचवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा हे म्हणायची आता वेळ आली...
मुली वरती लिहिले जातात किती तरी सुविचार
पण पण नेहमी जगाला का असतो स्त्रियांबद्दल कुविचार ..
"स्त्री" आहे प्रत्येक कहाणीचा सूत्रधार
आई, बहीण, प्रियसी, मैत्रीण अन् सरकार
पात्रातील रंगच नाही तर रंगमंच ती
जीवनाचा आधार अन् घटकेच्या निराधाराचा संचही ती
न समजणारी न उमजणारी जीवन कहाणी ती
अनेक रूपे अनेक भूमिका ती
इतिहास, वर्तमान आणि भविष्य ही ती
मुली असतील तरच होईल देशाची प्रगती
स्त्रीजन्म तर देशाची पहाट नवी
मान्य आहे तुम्हाला तुमच्या वंशासाठी दिवा हवा आहे पण त्या
वंशाचा दिवा पेटण्यासाठी एक स्त्री रूपी ज्योत तर शिल्लक असायला हवी ना..?.
स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव का होतो
आहे हे देशावरील मोठे संकट
आज परिस्थिती झाली आहे खूपच बिकट
म्हणून तुम्ही मोडू नका स्वप्नांना तिच्या उमलण्याआधीच तीच दाखवेल प्रकाशवाट काळोख माखण्याआधी
मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती
मुलीच्या जन्माचे करा स्वागत समाजातील सामाजिक स्थैर्य टिकवण्यासाठी होईल मदत...
अन् जन्म झाला मुलीचा तर देशाचा होईल विकास घडेल नवी क्रांती...
