STORYMIRROR

Manisha Potdar

Others

4  

Manisha Potdar

Others

तिच्या शिवाय...

तिच्या शिवाय...

1 min
499

स्त्रीच्या पोटी राम,रावण

स्त्रीच्या पोटी सत्य,असत्य

स्त्रीच्या नावे मान,अपमान

स्त्रीच्या पोटी देवी, दैत्य


स्त्री, महीला अथवा नारी

तिच्या नावे घडले रामायणे

इतिहास घडविला तिने भारी

तिचं करते सारखे पारायणे


तिनेचं घडविला राम, कृष्ण

तिनेचं घडविली झाशीची राणी

तिनेचं घडविले पांडव प्रताप

तिचं देते प्रेरणा आपल्या दानी


जीवनाची सुरवात स्त्री पासून

जीवनाची सोबत बायको म्हणून

लहानपनी भाऊ बहीणं सोबत

जीवनाचा आकार स्त्री पासून


ओवाळीते वाढविते आयूष्य

स्वभाव असतात वेगवेगळे

उत्पत्ती आपली तिच्या उदरी

असो कशीही तिचा सुगंध दरवळे


स्त्री अशी स्त्री तशी

तिच्या शिवाय नाही काही

स्त्री असते आई जशी

तिच्या शिवाय जगणे नाही


Rate this content
Log in