स्त्री अनेक रंगात रंगली,,,
स्त्री अनेक रंगात रंगली,,,
स्त्री अनेक
रंगात रंगली,,,
कधी आई बापाची
लेक होऊन,,,,
आई-बाबाच्या
प्रेमात रंगली,,,
कधी भावाची बेस्ट ,,,,
मैत्रीण होऊन,,,
भावाच्या प्रेमात रंगली,,,
कधी छोट्या बहिणीची
मैत्रीण होऊन,,,,
बहिणीच्या प्रेमात रंगली,,,
कधी ती लेक बहिण,,,
तर कधी अनोळखी,,,,
जबाबदारीत रंगली,,,,
कधी ती स्वतःच्या,,,
स्वप्नात रंगून गेली,,,
लगेचच,,,
स्वप्नाच्या दुनियेेच्या
बाहेर येऊन,,,
आई बाबाच्या ,,,,
आदेशाच्या रंगात रंगली,,,
लग्न झाल्यावर ती,,,,
सासरच्या माणसाच्या ,,,,
रंगात रंगली,,,
कधीच न भेटलेल्या,,,
मुलासोबत लग्न,,,करून,,,
ती त्या मुलाच्या प्रेमात रंगली,,,
कधी सून
कधी वहिनी
तर,,,
कधी जाऊ,,,
कधी आई,,,
कधी बायको,,,
अनेक नात्यात रंगली,,,
आणि,,,,
स्वतःचा रंग,,,,
मात्र,,, स्वतःचा रंग ,,,
विसरून गेली,,,
आणि,,,,
दुसऱ्याच्या रंगात रंगून गेली,,,
