स्त्रि
स्त्रि
एकवेळ तू चूल—मुल सांभाळलेस
चार भिंतीच्या आत
तू अन्याय सहन केलास
मान्स आहे मला
पण आता काळ बदलला आहे
तुझ्यासारख्या नारीच्या उदरी जन्म
घेतलेला मानव
तुझाच शत्रू बनू पाहत आहे
तुझ्या अब्रूंची लक्तरे
वेशीवर टांगत आहे
तू कालिका हो दुर्गा हो
मग बघ किती बदल होईल
मनातील भितीच्या शृृृंखला तुटतील,तुझ्या
अंतर्मनातील आत्मविश्वास,आत्मशक्ती
जागृृत होईल
याच बळावर मानवीरुपी नराधमाला
तू तुझ्या पायाखाली चिरडून टाकशील
आणि शेवटी काय?.....
हेच नराधम तुझ्या पायाशी लोळण घेतील
आपल्या मुली आई व बहिणीसाठी
आणि तुझा जयजयकार करतील.
नारी गं नारी
नारी गं नारी
नारी गं नारी
