सतीचं वाण
सतीचं वाण
एक होती कळी जिला उमलावंसं वाटलं
आभाळ भरुन आल्यागत दुःख मनात होतं दाटलं
झाडाच्या तर होतं मनात या कळीचं व्हावं फूल
नशिबानं तरी का द्यावी ऐनवेळी कळीला हूल?
कुठे नेईल आता स्त्रीच्या अस्तित्वाला तुझ्या निर्ममतेची वाट
आणखी किती वाहणार आहेत सांग असे रक्ताचे पाट?
सासरी होता जाच तिला छळायचे सगळे अतोनात
दारु पिऊन मारझोड करायचा नवरा ज्याची तिला हवी होती भक्कम साथ
सासूने मुलगी पाहून तिला करायलाच लावला गर्भपात
सुनेला शिव्या देताना वंशाच्या दिव्याचे होती ती गोडवे गात
दुसऱ्या वेळीही आहे आता मुलीचाच गर्भ पोटात
आता मात्र ती लढणार आहे ती घुसून शत्रूच्या गोटात
उगवेल आता आशेचा सूर्य होईल नवी पहाट
आता स्त्रीही चालेल पुरुषाच्या बरोबरीने येईल समानतेची लाट
नका करु भेदभाव दोघेही आहेत समान
अबला नव्हे सबला तू घे हे सतीचं वाण
