सतावणारा प्रश्न
सतावणारा प्रश्न
1 min
634
आजवरच्या जगण्याचं प्रयोजन काय ?
हा प्रश्न सतावत राहीला. ..
बालपण फक्तं हसलं खुदकन ....
किशोरवय मग्न होतं खेळण्यात अन् हुंदडण्यात
लक्षच नव्हते त्याचे अवती भवती. ...
कुमारवय मश्गुल होते भावनिक गुंत्यात ....
भविष्यवाटा शोधण्यात दमलेले अन स्वप्निल रंगात रंगलेले तरूणपण ...
प्रौढावस्था गर्क होती वर्तमाना ची ऊठबस अन् भविष्याची तरतूद करण्यात ...
वार्धक्य म्हणाले हे सारे टप्पे कधी पार पडले हे कधी लक्षातच आलं नाही तर कसं मिळेल या प्रश्नाचं उत्तर?
