षष्टाक्षरी - विठाई... विठाई
षष्टाक्षरी - विठाई... विठाई
1 min
27.8K
निघाली पालखी विठू माऊलीची
नयनासि आस विठू दर्शनाची
किर्तनी नाचतो हरिनाम ओठी
भक्तांचा मेळावा भीमेच्या हो काठी
पंढरीच्या राजा तुझा मी रे दास
असावा अखंड भक्तीचा प्रवास
विठू मायबाप या हो लेकरांचा
ब्रह्मानंदी देही ताल मृदुंगांचा
रुप हे सावळे दिसे ठायीठायी
अंतरी माऊली विठाई विठाई ....
