STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

2  

Manisha Wandhare

Others

षडयंत्र ...

षडयंत्र ...

1 min
60

इथे काहीतरी भयंकर षडयंत्र रचला आहे ,

चेहऱ्यामागे लपलेला चेहरा झाकला आहे ...

आसक्त विचारांचा किचकट धागाही गुंतलेला ,

कटकारस्थान रचताना अनभिग्न झाला आहे ...

मागमूसंही लागत नाही काही तो रक्तपीपासू,

वांझोट्या फांदी वरतीच डाव साधला आहे ...

हेवेदावे करता मनावर स्वार्थी आवरण चढले ,

रक्ताळले हात त्यांचे ज्यांचा काळ आला आहे ...

विनवीण्या करून सत्कर्माचे हात क्षिणले आहे ,

मनाला बंधनातून मुक्त करण्या वेळ आला आहे ...


Rate this content
Log in