सर्वं गुण सरपंच...
सर्वं गुण सरपंच...
गाव माझा ,हा समाज माझा.
कार्य हे समतोल माझा हातून घडते.
हातातील काटी किरडीचा बांबू बनते.
नीती मता विसरू नका,
वचनपूर्ती म्हणून ओरडणारे, जोलन विजून जाते.
राजकारण हे वैर नेत्या,नेत्या मधील राहिले नाही,
तर गावातील चौका, चौकात, गुंड वृत्तीने जन्मले, आहे.
वेसी वरून चुली पर्यंत चुली पासून बटवऱ्या पर्यंत,विभागले आहे.
कडू करले बोल आहेत
मनावर घेतले तर मोल आहेत
पक्ष ज्याचा तो विरोधी सोबत एक ताटात जेवतो.
भावकीतील पुढारी विरोधकला मत दिले म्हणून,वाळीत टाकतो.
भाव भावाचा नसतो पक्ष आणि नेता त्याला खूप, जवळचा वाटतो.
मतदान हे स्वयंम इच्छेचे दान नसून धरून बांधून केलेले
वैचारिक बलात्कार बनले आहे.
हाणून मारून करतात हनुमान..
चावट्यावर घेऊन नारळ फरवतील विचारतात कोणाला केले मतदान.
असल्या बुरड्या अंधश्रद्धा पुढऱ्याणच्या ढुंगणावर बांधायच्या,
जो गावच्या विकासा साठी असेल योग्य त्यालाचं द्याचा मान सन्मान.
पक्षाचं साटलोट झाले आहे, हीथे रक्ताच्या वाटण्या होत आहेत.
दारूची बाटली जिकडे, तिकडे गुलाल उधळतो.
हा खेळ आता ही गाव कपारी दिसतो
सच्या उमेदवार निवडणुकीसाठी आपली शेती घनवाट ठेवतो.
हा हे खरे बोल, जोमतील,
तुमचा कानात पोचले तरी मारतील.
निवडणुक आली की वाईट चांगल निवडता येणार नाही.
नंतर त्यांचा नावाने मिऱ्या वाटून राही.
सर्वं गुण सरपंच असा असावा..
त्याला गाव, गावातील माणसानचा अभिमान असावा,
गावचा पुढारी नको सरपंच.
गावातला टवाळखोर नको सरपंच.
नेत्यांच्या गाडी मागे धावणारा लाचारी नको हा पंच.
असावा रांगडा , मन मोकाळ, डावखोर,
शेतीत राबणारा, समाजवृत्ती जनता जण असा थोर.
स्वर्गाचे सुख म्हणजे गाव, गाव सुखात नादवणारे वर म्हणजे असावा सर्वं गुण सरपंच...
