सर्वात धनवान एक बाप
सर्वात धनवान एक बाप
का हो राव, का हा अपराध केला
का नाही आजही समान हक्क कन्नेला
कशाला नेहमी छळतात तिच्या चरित्र्याला
हक्क नाही म्हणून नेहमी दाबतात हो तिला
आज हा धडा मला एका व्यक्तीने शिकविला
म्हणतोय की कुणा समोर बोलण्याचा हक्क नाही तुला
म्हणताच त्याला मी एक प्रश्न विचारला
तुम्हाला जन्म देणारी कोण? ते आधी सांगा मला
मान खाली टाकून माय म्हटले उत्तराला
खचलेल्या शब्दांनी माफी मागितली मला
म्हटले की खऱ्या-खोट्याची आज ओळख झाली मला
म्हणतात की आज तुम्ही जीवनाचा खूप मोठा धडा शिकवला
झोपले होते मी आज जगवले तुम्ही मला
चला हो आज महत्त्व देऊ समानतेला
मिळणार सर्वच हक्क प्रत्येक कन्नेला
रोखण्याचा प्रयत्न माझा स्त्री भृणहत्येला
कन्नेला सौभाग्याने जन्माचा देवाने दर्जा दिला
स्वीकार करेल प्रत्येक जन या देवाच्या प्रसादाला
सजवेल ती आपल्या विचारांनी प्रत्येक घराला
कन्या जन्मली म्हणजे लक्ष्मी आली दाराला
देवाने सर्वात धनवान बनवले त्या बापाला
जिथे एका कन्नेचा जन्म आहे झाला
हो...! पैशांनी सुध्दा खूप लोकांना ऐश्वर्याचा अनुभव मिळाला
पण सर्वात धनवान या जगात एका कन्नेचा बापच ठरला.
